कंपनीचा सुरक्षारक्षक कामगारांचे 20 मोबाईल घेऊन पळाला

0
118

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) भोसरी, -कंपनीत मोबाईल वापरण्यास बंदी असल्याने कामगारांनी त्यांचे मोबाईल फोन सुरक्षारक्षक केबिनमध्ये जमा केले. ते मोबाईल फोन घेऊन सुरक्षारक्षक पळून गेला. ही घटना शनिवारी (दि. 6)रात्री पई ब्रदर्स इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड, भोसरी एमआयडीसी येथे घडली.

गुलशन कुमार (रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र दिनकर काकडे (वय 35, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काकडे यांच्या कंपनीमध्ये कामगारांना मोबाईल फोन वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे सर्व कामगार सिक्युरिटी केबिनमध्ये त्यांचे मोबाईल फोन जमा करतात. शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास नाईट शिफ्ट मधील कर्मचाऱ्यांनी त्यांचे मोबाईल फोन सिक्युरिटी केबिन मध्ये जमा केले. त्यानंतर तिथे नेमणुकीस असलेला आरोपी सुरक्षारक्षक गुलशन कुमार हा एक लाख 20 हजार रुपये किमतीचे 20 मोबाईल फोन घेऊन पळून गेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.