कंत्राटदाराच्या खोलीत अकाउंटंटने केली चोरी

0
184

वाकड, दि. ५ (पीसीबी) – कंपनीतील अकाउंटंटने कंत्राटदाराच्या खोलीतून एक लाख 28 हजारांचा माल चोरून नेला. ही घटना 28 मे रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास काळाखडक रोड, वाकड येथे घडली.

अक्रम जैनुद्दीन आरब (वय 30, रा. काळाखडक रोड, वाकड) यांनी सोमवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमनकुमार रॉय उर्फ बिहारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या ए ए कन्स्ट्रक्शन कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतो. त्याने फिर्यादी यांच्या खोलीचा दरवाजा बंद करून खोलीतील फिर्यादी यांच्या आठ हजारांच्या मोबाईल फोनमधील बँकेच्या अॅप मधून एक लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर 15 हजारांचा लॅपटॉप आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 28 हजारांचा ऐवज आरोपीने चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.