कंटेनरमधून अॅमेझॉन कंपनीच्या 48 लाख रुपयांच्या वस्तू लंपास, कंटेनर चालका विरोधात गुन्हा

0
198

पुणे , दि. २० (पीसीबी) – अमेझॉन कंपनीचे लॅपटॉप, मोबाईल व इतर महागड्या इल्क्ट्रॉनीक वस्तू एकस्पोर्ट करत असताना त्यातील तब्बल 48 लाख रुपयांचे महागड्या वस्तू लंपास केल्याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे,. हा सारा प्रकार 12 मार्च ते 14 मार्च याकालावधीत बेंगलोर ते आंबेठाण, पुणे या मार्गावर घडला आहे.

याप्रकरणी अनुज सचिव तिवारी (वय 25 रा. वाघोली) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, यावरून शाहिद इलियास (वय 25 रा. राजस्थाान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सेंच्युरी कार्गो कॅरियर ट्रन्सपोर्ट फर्म मध्ये आरोपी हा कंटेनर चालक म्हणून काम करत होता. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्याने बेंगलोर येथून अमझॉन कंपनीचे लॅपटॉप, मोबाईल, इतर इलेक्ट्रॉनीक वस्तू असा एकूण 1 कोटी 53 लाख 93 हजार 300 रुपयांचा माल भरला मात्र पुणे आंबेठाण येथे आले असता त्यातील 48 लाख 69 हजार 953 रुपयांचा माल हा गायब झाला होता. यावरून कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.