महाळुंगे,दि.11 (पीसीबी)
कंटेनरच्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. १०) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आंबेठाण-चाकण रोडवर आंबेठाण येथे घडला.
पूजा विनोद ढमाले (वय ४४, रा. कडूस, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मंगेश बाळासाहेब पानमंद (वय ३१, रा. सुदुंबरे, ता. मावळ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुंडलिक बाळू टोणे (वय ४४, रा. सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुंडलिक टोणे हा त्याच्या ताब्यातील कंटेनर (डीडी ०१/एफ९६५१) आंबेठाण-चाकण रोडने घेऊन जात होता. आंबेठाण येथे महिंद्रा सीआय कंपनी समोर आल्यानंतर टोणे याने त्याच्या ताब्यातील कंटेनरने समोर जाणाऱ्या दुचाकीला (एमएच १४/एलएफ ११७९) क्लिनर बाजूने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार पूजा ढमाले हिचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.