पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी)
कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती पत्नी गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरूवारी (दि. १६) जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर महावीर चौक चिंचवड येथे झाला. याप्रकरणी अनिल दादासाहेब जाधव (वय ४८) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटनेर चालक प्रभाकर विश्वनाथ भगत (वय ४७, रा. धावडे वस्ती शिवगणेश नगर भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल जाधव व त्यांची पत्नी सविता जाधव हे दुचाकीवरून चिंचवड स्टेशन बाजूने जात होते. त्यावेळी कंटनेरचालकाने बेधरकारपणे वाहन चालवत दुचाकीला मागून धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी व त्यांची पत्नी जखमी झाले.