कंगना राणौतला राष्ट्रपती भवनात ठेवा

0
202

लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून एकमेकांवर दबाव वाढविण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. या भेटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.

राज्याचे पावसाळी अधिवेशन २९ जून पासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी २६ जून रोजी विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडेल. त्यानंतर पुढील महिन्यात होणाऱ्या ११ जागांच्या विधानपरिषदांची चुरस दिसून येईल.