औंध रुग्णालयातील लाचखोर सिव्हिल सर्जन ताब्यात

0
156

पुणे, दि.७ (पीसीबी): सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण परवाना देण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यामार्फत लाच घेतल्या प्रकरणी जिल्हा रुग्णालय औंध छावणी, पुणे येथील सिव्हिल सर्जन डॉ. माधव बापूराव कनकवळे, वय – ५०,जिल्हा शल्य चिकित्सक वर्ग १, यांच्यासह त्यांचे सहकारी महादेव बाजीराव गिरी. वय – ५२, (प्रशासकीय अधिकारी वर्ग १) आणि संजय सिताराम कडाळे ,वय -४५, सहाय्यक अधीक्षक यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.

तक्रारदार यांचे शिक्रापूर येथील सोनोग्राफी सेंटरचे प्रमाणपत्राचे नूतनीकरण परवाना देण्यासाठी संजय कडाळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधव कणकवळे व महादेव गिरी यांचेकरीता ४० हजार रुपयांची लाच मागणी केली. पैकी १२ हजार रुपये लोकसेवक कडाळे यांनी स्वीकारले.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर, पोलीस उपअधीक्षक – सीमा अडनाईक, पो.हवा.नवनाथ वाळके, पो.हवा. अंकुश माने, चालक पो.कॉ. पांडुरंग माळी. लाप्रवि पुणे युनिट यांनी राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे परिक्षेत्र आणि सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.