पुणे, दि. 17 (पीसीबी) – पुण्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. नारायणगाव जवळ हा अपघात आज सकाळी दहाच्या सुमारास झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो पुढे फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही मॅक्स ऑटो आपटली. यात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर तिघे जखमी आहेत.
नेमकं काय घडलं?
या अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी धाव घेतली. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांमध्ये यात चार महिला, चार पुरुष आणि एका लहान बाळाचा देखील समावेश आहे. जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – नाशिक महामार्गावरती एसटीच्या मागे मॅक्स ऑटो जात होती. तर त्याच्या पाठीमागून आयशर टेम्पो प्रवास करत होता. आयशरने जोरात धडक दिल्याने मॅक्स ऑटो हा बसवर जाऊन आपटली. दोन्ही गाड्यांच्यामध्ये आल्याने मॅक्स ऑटो मधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. तर काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी आमदार शरद सोनवणे दाखल झाले, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, नारायणगावमध्ये ही अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. फार गंभीर अपघात झाला आहे. पुणे नाशिक हायवे वरती अपघात झाला आहे. एका आयशर टेम्पो चालकाने मागून प्रवासी वाहतूक करणाऱ्या या वाहनाला धडक दिली. ते वाहन पुढे जाऊन एसटीला धडकले आणि या झालेल्या भीषण अपघातामध्ये अनेक जण दगावले. काही जण जखणी झाले आहेत, आम्ही आता सरकारी दवाखान्यामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहोत. काही लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी आहेत, काही महिलांचा समावेश आहे अशी माहिती कळते. हा अपघात गंभीर होता प्रत्यक्षदर्शींनी याबाबत सांगितलं या आयशरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला उडवलं आणि तो पळून गेला. पण, पोलिसांनी त्याला शोधण्याचा काम केलं आहे. पुढे आयशरला पकडलेलं आहे. त्यामुळे खरा अपघात या आयशर चालकामुळे घडला आहे, अशी माहिती यावेळी बोलताना आमदार शरद सोनवणे यांनी दिली आहे.
पोलिस प्रकरणाचा तपास करतील. नेमकं काय घडलं आहे ते समोर येईल. आम्ही घटनास्थळी आलो आहोत. अपघातात गंभीर जखमींना सरकारी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केलेलं आहे. आसपासच्या परिसरातीलच ही लोक असल्याची माहिती आहे. आळेफाटा ते नारायणगाव असे प्रवास करणारे सर्वजण होते, याच मार्गावरती वाहतूक करणारे ते वाहन होते. या वाहनाची भीषण अवस्था झाली आहे. आयशर आणि त्या बसच्या मध्ये त्या छोट्या वाहनाचा चुराडा झाला आहे. मी आता सरकारी दवाखान्यात चाललो आहे. तिथे मी प्रत्यक्ष डॉक्टरांची भेट घेऊन बोलेन. जे यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करू असंही पुढे ते म्हणालेत.
या ठिकाणी अनेकदा अपघात झालेले आहेत. वाहन चालक ओव्हरटेक करण्याच्या नादात भान न राखता वाहने चालवतात. सकाळच्या वेळी हा अपघात झाला आहे. अशा प्रकारे वाहन चालक आपल्या वाहन चालवत असतील तर ते फार चुकीचा आहे, असंही आमदार शरद सोनवणे यांनी म्हटलं आहे.