ओला इलेक्ट्रिकने लॉंन्च केली फक्त 39,999 रुपयांची Electric Scooter; जाणून घ्या महत्वाचे तपशील

0
37

मुंबई, दि. 28 (पीसीबी) : ओला इलेक्ट्रिकने मंगळवारी 26 नोव्हेंबर रोजी इलेक्ट्रिक स्कूटरचे 2 नवीन मॉडेल लॉन्च केले. यासह, इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनीने व्यावसायिक स्कूटर विभागातही प्रवेश केला आहे. ओलाने व्यावसायिक वापरासाठी Gig आणि S1 Z नावाची दोन मॉडेल लॉन्च केली आहेत. कंपनीने Gig स्कूटरचे दोन भिन्न प्रकार सादर केले आहेत. ते म्हणजे Gig आणि Gig+ होय. दुसरीकडे S1 Z चे दोन भिन्न प्रकार देखील सादर केले गेले आहेत. ते म्हणजे S1 Z आणि S1 Z+ होय. ओला इलेक्ट्रिकचे Gig आणि Gig+ दोन्ही पूर्णपणे व्यावसायिक वापरासाठी असतील. तर S1 Z हे प्रवासी श्रेणीमध्ये आणि S1 Z+ व्यावसायिक श्रेणीमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.

कमाल वेग 25 किमी प्रति तास

Gig स्कूटर 1.5 kWh च्या बॅटरीसह लाँच करण्यात आली आहे. तिचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास असेल आणि ती एका चार्जवर 112 किमीची रेंज देईल. ही स्कूटर सिंगल बॅटरी पॅकसह येईल. ओला ने ही स्कूटर 39,999 रुपये किमतीत लॉन्च केली आहे.

Gig+ दुहेरी बॅटरी पॅकसह लाँच करण्यात आली आहे. यात 1.5 kWh ची बॅटरी असेल. एका बॅटरीसह ही स्कूटर एका चार्जवर 118 किमीची रेंज देईल. तिचाा टॉप स्पीड 45 किमी प्रति तास असेल. कंपनीने Gig+ ची किंमत 49,999 रुपये निश्चित केली आहे.

कंपनीने S1 Z ची किंमत

S1 Z आणि S1 Z+ ही स्कूटर 1.5 kWh x 2 (3 kW) पॉवरसह लॉन्च केली आहे. ही स्कूटर सिंगल बॅटरीसह येईल आणि त्यात स्वतंत्रपणे बॅटरीही लावता येईल. एका बॅटरीसह, ही स्कूटर एका चार्जमध्ये 75 किमीची रेंज देईल आणि दुहेरी बॅटरीसह, ती 146 किमीची श्रेणी देईल. त्याचा टॉप स्पीड 70 किमी प्रति तास असेल. S1 Z ची किंमत 59,999 रुपये आणि S1 Z+ ची किंमत 64,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

Gig स्कूटरही भाड्याने मिळतील

ओला इलेक्ट्रिकने एका निवेदनात म्हटले की, ही सिरीज बिझनेस-टू-बिझनेस (B2B) खरेदी आणि भाड्याने दोन्हीसाठी उपलब्ध असेल. ओला इलेक्ट्रिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भाविश अग्रवाल म्हणाले, “गिग आणि S1 Z स्कूटरच्या मालिकेसह आम्ही या स्कूटर्ससह EV च्या स्विकार्यतेमध्ये आणखी तेजी आणू.’ कंपनीने यासोबतच आपले पॉवरपॉडदेखील लॉन्च केले आहे. जे इन्वर्टर आणि पोर्टेबल बॅटरीचा उपयोग करून घरात वीज वापरण्यास मदत करू शकतात. कंपनीने याची किंमत 9999 रुपये निश्चित केली आहे.