ओबीसी आरक्षणासाठी आता खंडपीठ स्थापन

0
363

– पाच आठवड्यांनी सुनावणी लांबली

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) : महाराष्ट्र स्थानिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पक्षांना 5 आठवडे या प्रकरणी यथास्थिती ठेवण्याचे निर्देश दिले आणि त्यासाठी विशेष खंडपीठ स्थापन केले जाईल असे सांगितले. य़ा प्रकरणी दिनांक 20.07.2017 च्या आदेशानुसार, न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागासवर्गीय आयोगाने शिफारस केल्यानुसार  ओबीसी आरक्षणास परवानगी दिली होती परंतु न्यायालयाने स्पष्ट केले होते की 367 संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले जाऊ शकत नाही जेथे निवडणूक प्रक्रिया आधीच अधिसूचित करण्यात आली होती.

दरम्यान, ओबीसी आरक्षणानुसार नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबतही आता अनिश्चितता वाढली आहे. सुनावणी लांबणीवर पाडली आहे. ९२ नगरपालिकांच्या निवडणुकीचा निर्णय लांणीवर पडला आहे