मुंबई, दि. ८ (पीसीबी) : नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज अखेर बिगुल वाजला. राज्य सरकारला मोठा दणका बसला असून ओबीसी आरक्षणाशिवाय १७ जिल्ह्यांमधील तब्बल ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. पर्यन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतींच्या निवडणूकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला.
या निवडणूकीची प्रक्रीया २० जुलैपासून सुरु होणार असून १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. तर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहिर केले जाणार आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार २० जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी २९ जुलै रोजी जाहिर केली जाणार असून ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.