ओबीसी आरक्षणाचा निर्णय बदलण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले

0
488

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी)महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला जोरदार फटकारले आहे .. ३६७ ठिकाणी निवडणुकांच्या तारखेत बदल केल्याने संतप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने याआधी निवडणुकीची अधिसूचना जारी केलेल्या ३६७ ठिकाणी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट केले. त्या जागांसाठी नवीन अधिसूचना जारी करता येणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने तसे केल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल, असा इशारा न्यायालयाने दिला.

कोर्टाने ओबीसी आरक्षणाला परवानगी दिल्यावर मतदानाचे वेळापत्रक आधी अधिसूचित करण्यात आले होते. त्या संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट केले की, संबंधित अधिकारी त्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल अवमानास जबाबदार असतील.महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. वास्तविक, राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रमाच्या तारखांमध्ये बदल केल्याचे वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते.