ओबीसींच्या न्याय व हक्कांसाठी ओबीसी साहित्य संमेलन काळाची गरज – विजय वडेट्टीवार

0
253

पुणे, दि.७(पीसीबी) – ओबीसी युवकांमध्ये वाचन संस्कृती वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी ओबीसी साहित्य संमेलन गरज असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते मा विजय यांनी व्यक्त केले. ते बारा बलुतेदार महासंघ आयोजित ओबीसी विचार मंथन गोलमेज परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले की ओबीसींची युवा पिढी मोबाईल व सोशल मीडियामध्ये गुंतली असून त्यांना वाचन संस्कृतीची जाणीव दोन देण्याची गरज आहे. अन्यथा ओबीसी समाजाचा काळ मोठा बिकट होईल. आज पर्यंत इतिहास पाहता प्रगती करणाऱ्या समाजामध्ये साहित्य संमेलणांची भूमिका महत्त्वाचा बजावली आहे. ओबीसी समाजामध्ये असून बहुजन समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी ओबीसी साहित्य संमेलने होणे गरजेचे आहे. साहित्यिकांना सन्मानित करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम केले पाहिजे त्यासाठी त्यासाठी आवश्यक असणारे सहकार्य मी करण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या ओबीसी गोलमेज परिषदेमध्ये ओबीसी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तथा सांस्कृतिक समस्यांवर चर्चा करून भविष्यकालीन उपाययोजना करणे, ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी जात निहाय जनगणना व्हावी, ओबीसींना लागू असलेली “क्रिमीलेअर ची असंविधानीक अट रद्द व्हावी यासाठी राज्यस्तरीय विचारमंथन करण्यात आले असल्याची माहिती बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी दिली

ओबीसी समाजाची साहित्यिक तथा सांस्कृतिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी भविष्यकालीन वाटचाल व उपाययोजना साठी ओबीसी समाजाचे दोन दिवसीय साहित्यिक तथा सांस्कृतिक संमेलनाचे नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले असुन ओबीसी समाजासाठी प्रेरणास्थान म्हणून जेजुरी गड निश्चित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी दिली.

यावेळी, बारामहासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, प्रतापराव गुरव, प्रदेश उपाध्यक्ष भगवान श्रीमंदीलकर, युवक काँग्रेस युवाप्रदेशाध्यक्ष भाई विशाल जाधव, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या अध्यक्ष शंकरराव लिंगे,अरुण खरमाटे,ओबीसी संघर्ष समिती अध्यक्ष आनंदा कुदळे,किसनराव जोर्वेकर, दादासाहेब मुंडे, सतिश कसबे, विवेक राऊत, वंदना कुमावत, इकबाल अन्सारी, कुंडलिक गायकवाड,दामोदर बिडवे, दशरथ राऊत, संगीता बोराटे, बलभीम माथीरे, प्रार्थना मुंडे, आदि मान्यवर उपस्थित होते.

गोलमेज परिषदेचे आयोजन बारा बलुतेदार महासंघांचे प्रदेश उपाध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रतापराव गुरव,युवाप्रदेशाध्यक्ष भाई विशाल जाधव, विवेक राऊत,दिनकर चौधरी, यांनी यशस्वी आयोजन केले.सूत्रसंचालन अक्षय ढोके यांनी केले तर प्रा. सुभाष दगडे यांनी मानले.