ओढ्याच्या काठावर लावलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

0
355

शिरगाव दि,११ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील पुसाणे गावात ओढ्याच्या काठावर लावलेल्या दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारला. यामध्ये सात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई शनिवारी (दि. 9) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी 23 वर्षीय महिलेला अटक केली असून तिच्यासह तिचा साथीदार देव शिवम राठोड (वय 25 रा पाचाणे, कंजारभाट वस्ती, मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार समाधान फडतरे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी गुळ मिश्रित कच्चे रसायन एकत्र केले. पुसाणे गावातील ओढ्याच्या काठावर त्यांनी दारूभट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई करत सात लाख 500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिचा साथीदार पळून गेला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.