ओटास्कीममध्ये एकास लाकडी दांडक्याने मारहाण

0
97
crime

दि. १९ ऑगस्ट (पीसीबी) निगडी
भांडणे करू नका, असे समजावून सांगितल्याच्या कारणावरून एकास लाकडी दांडक्याने मारहाण करीत हात फॅक्चर केले. ही घटना 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथे घडली.

अंश ऊर्फ दाद्या विद्याधर पाडाळे आणि एक महिला (दोघेही रा. पीसीएमसी कॉलनी, ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सागर राजेंद्र लिमकर (वय 45) यांनी रविवारी (दि. 18) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ओटास्कीम येथील बिल्डींग नं. सात समोरून चालले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी माझया मुलांसोबत भांडण करू नकोस, असे सांगितले. या कारणावरून चिडलेलया आरोपी अंश याने घरातून लाकडी बांबू आणून फिर्यादी यांना मारहाण केली. यामुळे फिर्यादी यांचा हात फॅक्चर झाला. तसेच महिला आरोपी हिने फिर्यादी यांच्या दिशेने दगड मारून शिवीगाळ केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.