ओएलएक्स वरील वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने नऊ लाखांची फसवणूक

0
303

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – ओएलएक्स वरील वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीने महिलेची आठ लाख ९७ हजार ४१ रुपयांची फसवणूक केली. ही घटना ३० सप्टेंबर रोजी दुपारी वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 916295540438 क्रमांक धारक आणि दोन बँक खाते धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा फ्रीज विकण्याची ओएलएक्सवर जाहिरात दिली. ती जाहिरात पाहून अनोळखी व्यक्तीने फिर्यादींना फोन केला. फोन करून जुना फ्रीज विकत घेतो असे सांगून फिर्यादीस त्याच्या दोन बँक खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडून आठ लाख ९७ हजार ४१ रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.