ओएलएक्स वरील कार खरेदीच्या बहाण्याने फसवणूक

0
360

वाल्हेकरवाडी, दि. ११ (पीसीबी) – ओएलएक्स वरून कार खरेदीच्या बहाण्याने संपर्क करत मूळ कागदपत्रांसह कार घेऊन जात फसवणूक केली. हा प्रकार 26 ऑक्टोबर 2020 ते 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत वाल्हेकरवाडी येथे घडला.

अझहर मणियार, असीम अमीन कादरी (दोघे रा. नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विठ्ठल अप्पासाहेब व्हनमाने (वय 32, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्हनमाने यांनी त्यांची एर्टिगा कार (एमएच 14/एचजी 9226) विकण्यासाठी ओएलएक्स या संकेतस्थळावर जाहिरात दिली. ती जाहिरात पाहून आरोपींनी त्यांना संपर्क केला आणि 11 लाख 20 हजार रुपयांना कारचा व्यवहार ठरवला. त्यातील दोन लाख 70 हजार रुपये आरोपींनी फिर्यादींना पाठवले. त्यानंतर कारचे मूळ कागदपत्र आणि कार आरोपींनी नेली. उर्वरित रक्कम ही कर्जाची असल्याने ते कर्ज आरोपी फेडणार असे व्यवहारात ठरले होते. मात्र आरोपींनी कर्जाचे हप्ते न भरता, कागदपत्रे आणि कार न देता फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

वाल्हेकरवाडी, दि. १० (पीसीबी) – ओएलएक्स वरून कार खरेदीच्या बहाण्याने संपर्क करत मूळ कागदपत्रांसह कार घेऊन जात फसवणूक केली. हा प्रकार 26 ऑक्टोबर 2020 ते 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत वाल्हेकरवाडी येथे घडला.