पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – ओएलएक्सवरील जाहिरात पाहून जाहिरातदारांना संपर्क करून त्यांची फसवणूक केल्याचे दोन प्रकार पिंपरी परिसरात उघडकीस आले आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये पाऊण लाखांची फसवणूक झाली आहे.
विक्रम मिलिंद रानडे (वय 28, रा. वानवडी, पुणे) यांनी पहिल्या प्रकरणात फिर्याद दिली. त्यानुसार 9354762997 या क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या घरातील सोफा सेट विकण्याबाबत ओएलएक्स वर जाहिरात दिली होती. त्यांना आरोपीने फोन केला आणि एक क्युआर कोड पाठवला. त्यांनतर काही टप्प्यात आरोपीने फिर्यादी यांच्या पेटीएम द्वारे 47 हजार 997 रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली.
हर्षल सुनील शिंपी (वय 27, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी दुस-या प्रकरणात फिर्यादी दिली. त्यानुसार प्रमोद कुमार (7873067245) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या घरातील एसी, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, बेड, वॉलरुफ, डायनिंग टेबल अशा घरगुती वापराच्या वस्तू विकण्याबाबतन ओएलएक्स वर जाहिरात दिली. ती जाहिरात पाहून आरोपीने फिर्यादींना फोन केला. वस्तू विकत घेण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून फिर्यादी यांची 27 हजारांची ऑनलाईन फसवणूक केली.










































