“ऑल इंडिया फ्रेंड्स सर्कल” भाऊसाहेब भोईर यांच्या पाठीशी

0
58

चिंचवड. दि.११ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर हे सर्वांगीण विकासासाठी योग्य उमेदवार असल्याने मुस्लिम ऑल इंडिया फ्रेंड्स सर्कल संघटनेने भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा दिला असून संघटनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते चिंचवड येथे भाऊसाहेब भोईर यांची भेट घेवून त्यांनी भोईर यांच्याशी चर्चा करून ऑल इंडिया फ्रेंड्स सर्कल संघटना ही भाऊसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून त्यांना जाहीर पाठिंबा असल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाऊसाहेब भोईर यांना मुस्लिम बांधवांकडून मोठे मताधिक्य मिळेल हे चित्र स्पष्ट झाले आहे.

कपाट हे निवडणूक चिन्ह घेवून निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून भाऊसाहेब भोईर हे उतरले आहेत. भोईर यांच्या प्रचाराचा वेग वाढल्याने चिंचवड मतदारसंघातील  विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. तसेच विविध समाज बांधव स्वतः भोईर यांची भेट घेवून आपण सोबत असल्याचे सांगत आहेत. तर काही समाज बांधवांनी यंदा भाऊसाहेब भोईर यांना आमदार करण्याचा ध्यास घेवून भाऊसाहेबांना जोडले जात आहेत.

चिंचवडच्या विकासासाठी ए. पी. जी अब्दुल कलाम यांचे विचार घेऊन मुस्लिम युवक भाऊसाहेब भोईर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा ठाकला आहे. यावेळी ऑल इंडिया फ्रेंड्स सर्कल चिंचवड शहरचे अध्यक्ष यासीन भाई शेख, सोहेल भाई शेख, मुशरफ सय्यद, शाहरुख शेख, साजिद कुरेशी, सलमान शेख,अवेज खान, फैजाम शेख, रहीम शेख, शकील शेख  व सर्व मित्र परिवार उपस्थित होते. भाऊसाहेब भोईर यांनी मुस्लिम बांधवांच्या अडी – अडचणी जाणून घेतल्या. व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचा शब्द भोईर यांनी ऑल इंडिया फ्रेंड्स सर्कल संघटनेला दिला आहे.