ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीच्या अध्यक्षपदी दिपक राहिंज..

0
411

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीच्या अध्यक्षपदी दिपक राहिंज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी राहिंज यांना नियुक्ती पत्र दिले.च-होलीत झालेल्या कार्यक्रमाला माजी नगरसेवक किसन महाराज तापकीर, योगेश लांडगे, महावीर काळे, संजय नाईकवाडे, सुनील बनसोडे, हिराकांत गाडेकर, कुणाल तापकीर, विनायक राहिंज, सोमनाथ ओव्हाळ, संतोष पांढरे, संजय कवितके, ज्योती तापकीर, सुनीता काळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

धनगर समाजाच्या हिताचे संवर्धन करण्यासाठी दिपक राहिंज गेले अनेक वर्ष काम करत आहेत. समाजाचे हित जोपसण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असत. धनगर समाजाचे संवर्धन आणि समाजहिताचे रक्षण व्हावे. या हेतूने राष्ट्रीय पातळीवर पोटशाखा, भेद, प्रांतभेद, भाषाभेद, बाजूला ठेऊन सर्व धनगर समाज एक होत आहे. या राष्ट्रीय प्रवाहात राहिंज यांना सामावून घेतले आहे.

आजपर्यंतची कामाची दखल घेऊन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीच्या अध्यक्षपदी युवा उद्योजक दिपक राहिंज यांची नियुक्ती केली आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढून संघटना अधिक मजबूत करणार आहे. युवकांची मोठी फळी उभी करणार असल्याचे राहिंज यांनी निवडीनंतर सांगितले.