पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – ऑनलाईन माध्यमातून नोकरी शोधणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. एका संकेतस्थळावरून नोकरी शोधत असताना व्यक्तीस पैशांची मागणी करत एक लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २५ फेब्रुवारी रोजी पिंपरी येथे घडला.
प्रकाश रमेश अडवाणी (वय ३९, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अडवाणी हे एका संकेतस्थळावरून नोकरी शोधत होते. संकेतस्थळावर त्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म भरला असता त्यांना व्हाट्सअपवर मेसेज करण्यात सांगितले. पुढे अडवाणी यांच्याशी टेलिग्रामद्वारे संपर्क करून त्यांच्याकडून एक लाख ३४ हजार १५ रुपये घेतले. पैसे घेऊन त्यांना नोकरी न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.










































