ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये 20 लाखांची फसवणूक

0
623

वाकड, दि. १ (पीसीबी) -ऑनलाईन ट्रेडिंग करण्यास सांगत तिघांनी मिळून एका व्यक्तीची 20 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 4 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत वाकड येथे घडली.

अमित मदनराव काटे (वय 39, रा. वाकड. मूळ रा. नागपूर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केविन, लिसा, वॉरेन (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि पैसे ट्रान्सफर झालेल्या युपीआय आयडी धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मोबाईल नंबर एका व्हाटस अप ग्रुपला जॉईन झाला. त्या ग्रुपमध्ये आरोपींनी एक लिंक पाठवून एप डाऊनलोड करण्यात भाग पडले. त्यानंतर ऑनलाईन ट्रेडिंगच्या बहाण्याने पैसे घेण्यास सुरुवात केली. काही रक्कम भरल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या ट्रेडिंग खात्यावर एक कोटी 23 लाख 83 हजार 302 रुपये जमा झाल्याचे दाखवले. ते पैसे काढून घेण्यासाठी दहा टक्के कर भरावा लागेल, असे सांगून फिर्यादीकडून एकूण 20 लाख 85 हजार 330 रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना कोणतीही रक्कम न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.