थेरगाव, दि. २४ (पीसीबी) – ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची आठ लाख 96 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 12 ते 20 एप्रिल या कालावधीत थेरगाव येथे ऑनलाईन माध्यमातून घडला.
विभोर विनय शुक्ला (वय 33, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 254794155003, 3366458048 या क्रमांकावरून व्हाटस अप लिंक पाठवणारे, फ्री लान्सर कंपनीत काम करणारी महिला लतीशा, टेलिग्रामचा रेसेप्शनिस्ट फराह, अलीना आणि अन्य व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञातांनी फिर्यादी यांना व्हाटसअपवर मेसेज करून व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील, असे सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यानं एक लिंक पाठवून लिंक जॉईन करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादींना आर्थिक फायदा होईल असे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास सांगितले. फिर्यादी यांनी आठ लाख 96 हजार 400 रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसात धाव घेऊन गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.