ऑनलाईन जुगार चालवणाऱ्या पाच जणांना अटक

0
124

हिंजवडी, दि. 1 (प्रतिनिधी)
ऑनलाईन जुगार चालवणाऱ्या पाच जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 29) रात्री मेगापोलीस मायस्टिक सोसायटी, हिंजवडी येथे करण्यात आली.

अनुराग अगरदास बंजारे (वय 20), नवीन संजय गजभिये (वय 20), अमोस ओस्कर मिंज (वय 19, तिघे रा. हिंजवडी, मूळ रा. छत्तीसगड), धनंजय विश्वंभर पाल (वय 24), राहुल मदनसिंह कुमार (वय 21, दोघे रा. हिंजवडी. मूळ रा बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज तीन येथील मेगापोलीस या सोसायटीमध्ये काही तरुण हे नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून जुगार खेळण्यासाठी उपलब्ध करून देत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत पाच जणांना अटक केली. हे आरोपी reddybook.blue या संकेतस्थळावरून जुगार उपलब्ध करून देत होते. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.