थेरगाव, दि. २२ (पीसीबी) – ऑनलाइन टास्क मधून पैसे कमावण्याच्या बहाण्याने तरुणाचे 71 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 7 ते 8 डिसेंबर या कालावधीत थेरगाव येथे घडला.
याप्रकरणी 27 वर्षे तरुणांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.20) फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारक, बँक खाते धारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला आरोपीने फोनवर संपर्क साधून मीडिया मंत्रा ग्रुप मधून नेहा शर्मा बोलत असल्याचे सांगितले. यावेळी गुगल रिव्ह्यू मॅप चा टास्क फिर्यादीला देण्यात आला सुरुवातीला काही प्रीपेड टास्क घेऊन काही रक्कम फिर्यादीला देण्यात यावी त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करायला सांगून पुढील कोणताही नफा त्यांना देण्यात आला नाही. अशा प्रकारे फिर्यादीचे आरोपींनी 71 हजार 500 रुपयांची फसवणूक केली , यावरून फिर्यादीने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.