ऑनलाइन जॉब चे आमिष दाखवून वाल्हेकरवाडीतील महिलेची पावणे पाच लाखांची फसवणूक

0
296

वाल्हेकरवाडी, दि. २९ (पीसीबी) – ऑनलाईन जॉब चे आमिष दाखवून एका महिलेचे तब्बल पावणे पाच लाख रुपयांचे ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 11 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी 2023 या कालावधीत चिंचवड मधील वाल्हेकर वाडी परिसरात घडला.

या प्रकरणी संबंधित महिलेने गुरुवारी (दि.28) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी काही बँक अकाउंट धारक व एका मोबाईल क्रमांक धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना ऑनलाइन जॉब करता आरोपींनी आमिष दाखवले. मात्र त्यासाठी त्यांना डेटा विकत घेण्यास सांगून काही ऑनलाईन टास्क दिले होते. टास्क पूर्ण केल्यानंतर चांगली रक्कम मिळेल असे त्यांना सांगण्यात आले. मात्र वारंवार डेटा विकत घेण्याचा बहाणा करून आरोपींनी फसवणूक करून त्यांना तब्बल 4 लाख 72 हजार 500 रुपयांना लुबाडले आहे. यावरून चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.