दि.०६(पीसीबी)-भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चात संघटनात्मक बळकटीसाठी ऐश्वर्या अमित बाबर यांची भाजप पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबाबत भाजप महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा तथा नगरसेविका सौ. सुजाता सुनिल पालांडे यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले. “पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी सोपविण्यात आलेली जबाबदारी ऐश्वर्या बाबर यशस्वीपणे पार पाडतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांच्या पुढील राजकीय आणि पक्षीय कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
ऐश्वर्या बाबर यांच्या नियुक्तीमुळे महिला मोर्चाला अधिक बळ मिळणार असून, स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. शहरातील विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.दरम्यान, या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात भाजप संघटन आणखी मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.








































