ऐश्वर्याने बच्चन कुटुंब सोडलं ?

0
208

अभिनेत्री ऐश्वर्या राय ही सध्या बॉलिवूडपासून लांब आहे. ती तिच्या वैयक्तिक जीवनाला घेऊन नेहमी चर्चेत असते. मध्यंतरी तिच्या घटस्फोटाबाबत अनेक अपडेट समोर येत होत्या. ऐश्वर्याच्या नव्या एका पोस्टमुळे ऐश्वर्याने बच्चन कुटुंब सोडलं की काय? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे.

ऐश्वर्या राय ही नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलला भेट देऊन आली. तिने तिथे रॅम्प वॉक देखील केला. तिचा हात फ्रॉक्चर झाल्याचं दिसत होतं. ऐश्वर्या कान्सवरून आपल्या आईच्या घरी परतली आहे. तिने नुकताच आपल्या आईचा वाढदिवस साजरा केला आहे. मात्र फोटोमध्ये ऐश्वर्या, मुलगी आराध्या आणि ऐश्वर्याची आई दिसत आहे. यामध्ये अभिषेक बच्चन दिसत नसल्याने अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा आला आहे का?, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

ऐश्वर्याची पोस्ट चर्चेत
सोशल मीडियावर आता ऐश्वर्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ऐश्वर्याची आई, मुलगी आणि तिचे दिवंगत वडील दिसत आहे. या फोटोला तिने तिच्या फोटोला प्रिय आई-बाबा अशी पोस्ट लिहिली आहे. आता ऐश्वर्याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.