ए.आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन

0
376

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्या पत्नी श्रीमती नर्गिस अंतुले यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार आंबेत या मूळगावी त्यांच्या निवासस्थानी होणार आहे. त्यांच्या पश्चात नीलम, मुबीना आणि शबनम या तीन मुली तसेच त्यांचे जावई मुश्ताक अंतुले असा मोठा परिवार आहे. त्यांचे पुतणे नविद अंतुले यांचे चार वर्षापूर्वीच निधन झाले. अंतुले यांच्या राजकारणात पत्नी नर्गिस यांनी मोठी साथ दिली होती.

बॅरिस्टर अंतुले आणि नर्गिस यांचा १९५७ मध्ये विवाह झाला होता. जेव्हा बॅरिस्टर अंतुले पहिल्यांदा नर्गिस यांना भेटले, तेव्हा पहिल्या नजरतेच त्यांनी नर्गिस यांना प्रेमाचा होकार कळविला, त्यावेळी नर्गिस या केवळ १६ वर्षांच्या होत्या. त्यांनी पुढे ४ वर्षे वाट पाहिली. नर्गिस यांच्या वयाच्या २० वर्षी त्यांनी अरेंज मॅरेज पद्धतीने बॅरिस्टर अंतुले यांच्याशी विवाह केला. १९५७ पासून अंतुले यांच्या निधनापावेतो म्हणजेच २०१४ पर्यंत त्यांनी सुखी संसार केला. मुंबईतील चर्चगेट परिसरात त्यांचे वास्तव्य होते. नर्गिस यांना लिखाणाची वाचनाची आवड होती.