श्रेया तरस ची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या निवड चाचणी साठी निवड
दि.२६(पीसीबी) -पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील १७ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाने विभागीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, कोकमठाण येथे झालेल्या विभागीय क्रिकेट स्पर्धेत रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील १७ वर्षाखालील मुलींच्या संघास पिंपरी चिंचवड जिल्हा विजेत्या संघाचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला. तृतीय क्रमांक साठी पिंपरी चिंचवड जिल्हा संघ आणि सोलापूर ग्रामीण जिल्हा संघात लढत झाली. पिंपरी चिंचवड जिल्हा या संघाने प्रथम फलंदाजी करत ५ षटकात ५० धावा ठोकल्या. प्रतिस्पर्धी सोलापूर जिल्हा ग्रामीण संघाला ५ षटकात अवघ्या २० धावांत रोखले आणि विजय मिळवला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विजयी संघामध्ये श्रेया तरस, अनघा आहेर, आस्था टाक यांनी उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी करत उत्तम कामगिरी केली. या कामगिरी मुळे श्रेया तरस ची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या निवड चाचणी साठी निवड करण्यात आली. संघामध्ये वीरा काटकर, तनवी पंके, आराध्या तांगडकर, सानवी मुळीक, अनुष्का लोखंडे, आरोही फुर्डे, स्वरा बालघरे, ऋतुजा पांडे, वृंदा कोडीतकर यांचा समावेश होता.
या क्रिकेट स्पर्धेत पुणे जिल्हा, पुणे शहर, सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, अहिल्यानगर शहर, अहिल्यानगर ग्रामीण च्या जिल्हा विजेता संघांनी सहभाग घेतला होता.एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या संघाला प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापक शुभांगी कुलकर्णी, क्रीडा शिक्षक चंद्रकांत ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले.पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजयी संघाचे अभिनंदन करून श्रेया तरस ला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.











































