पुणे दि. १८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे “झिंग २०२५” हा सांस्कृतिक कार्यक्रम, विविध बौद्धिक स्पर्धा आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन प्रसंगी गुरुवारी (दि.२० मार्च) “मिसेस इंडिया २०२४” या फॅशन शोमध्ये प्रथम रणरअप झालेल्या सई खलाटे आणि शनिवारी (दि. २२ मार्च) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास चित्रपट अभिनेते अनिल गवस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होणार आहेत. एसबीपीआयएम व्यवस्थापन कौशल्य व संशोधनाला प्रोत्साहन देणारी राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त व्यवस्थापन संस्था आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून, झिंग या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक, उद्योजक आणि सामाजिक जबाबदारीचे भान रुजवणे, त्यांना व्यवस्थापन आणि संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन देणे अशा बौद्धिक स्पर्धा यावेळी घेण्यात येणार आहेत.
“झिंग २०२५” मध्ये आयपीएल ऑक्शन, ट्रेजर हंट, ग्रुप डान्स, सोलो डान्स, मनोलोग कॉम्पिटिशन, बिझनेस कॉम्पिटिशन, मिस्टर इंडिया व मिस्टर इंडिया डे अशा विविध मॅनेजमेंट गेम्स होणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे. डॉ. प्रणिता बुरबुरे, डॉ. हिना मुलानी या कार्यक्रमाच्या समन्वयक आहेत.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.