इलेक्ट्रोल बॉन्डचा तपशील मंगळवारी सायंकाळ पर्यंत द्यावा, अन्यथा तुमच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याची केस दाखल करण्याचा इशारा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया अक्षरशः ट्रोल झाली आहे. बँकेचे शेअर सुमारे ३० रुपयांनी घसरलेत. सोमवारी न्यायालयाने फटकारले तेव्हाच ७८९.४० चा बँकेचा शेअर होता, नंतर तो ७५९ रुपये पर्यंत म्हणजे ३० रुपयांनी घसरला.
सोशल मीडियात हजारो नागरिकांनी एसबीआय ची खूप टर उडवली आहे. बँक तसेच केंद्र सरकारबद्दलही ग्राहकांच्या भावना तीव्र आहेत. निवडक कमेंटस खालील प्रमाणे आहेत.
काही कारणास्तव एसबीआय ची YONO सेवा मंगळवारी, १२ मार्च रोजी दु. ३.४५ पर्यंत उपलब्ध होणार नाही. आमच्या दुसऱ्या सेवा म्हणजेच YONO Lite, Internet Banking, UPI या नेहमीप्रमाणे सुरू असतील
असे आवाहन बँकेने त्यांच्या वेबसाईटवर ग्राहकांना केलेले आहे. एसबीआय च्या या एका मेसेजवर हजारो ग्राहकांनी बँकेची अक्षरः टर उडवली आहे. ग्राहकांनी दिलेल्या कमेंटस् वाचल्यावर एसबीआय व्यवस्थापनावर तुफान टीकेचा भडिमार झाल्याचे दिसले. न्यायालयाने इशारा दिल्याने शेअर मार्केटमध्ये बॅंकेचे शेअर्स कोसळले आणि मोठा फटका बसलाच आहे. आता दुसऱ्या बाजुने बँकेची अक्षऱशः छी थू झाल्याचे चित्र आहे.
ग्राहक त्यांच्या कमेंटस् देताना म्हणतात, एसबीआय नव्हे स्विस बँक ऑफ इंडियाआहे.
इलेक्ट्रोल बॉन्डचे काय झाले ते सांगा ? ,
YONO काही वेळेसाठी बंद असेल तर हरकत नाही, पण लोकांना फसवू नका. एलेक्ट्रोल बॉन्ड मधील नावे प्रथम सांगा ,
सर्वोच्च न्यायालयाला खरे खरे सांगा, राजकीय नेत्यांची पाठराखण करू नका ,
खरोखर मी आता एसबीआय च्या नावाबाबत संभ्रमात आहे, कारण ही स्विस बँक ऑफ इंडिया र नव्हे ना ,
SBI नव्हे शेठ बँक ऑफ इंडिया अशा एकसो एक भन्नाट कमेंटस् आहेत.
भाजपचे नाव न घेता एका ग्राहकाने म्हटले आहे की, निवडणूक जिंकण्यासाठी २०१४ मध्ये आश्वासन दिले होते की, स्विस बँकेतील खातेदारांची त्या सर्व माहिती उघड करू, आता स्टेट बँकेची माहिती उघड करायलाही घाबरताहेत.