पिंपरी, दि. १६ (पीसीबी)
एसटी बसच्या धडकेत तिघेजण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. 14) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास जुना पुणे मुंबई महामार्ग मोरवाडी पंक्चर येथे घडली.
मनीष काशिनाथ भालेराव (वय 35), रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एसटी बस (एमएच 14/एलबी 0478) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालेराव हे त्यांच्या सासू-सासरे यांच्यासोबत घरी जात होते. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून मोरवाडी पंक्चर येथे बाहेर पडत असताना एसटी बसने भालेराव यांच्या सासऱ्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये भालेराव यांचे सासू-सासरे आणि मुलगी जखमी झाले आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.










































