“एवढं तर चालतं ना..! म्हणतं त्यांनी केले अश्लील चाळे”, अभिनेत्रीने केला साजिद खानबाबत धक्कादायक खुलासा

0
305

मुंबई, दि. 26 (पीसीबी) – “मी सिनेमा इंडस्ट्रीत नवी होती. फार लोकांशी माझ्या ओळखी नव्हत्या. एक दिवस मी पार्टीला जुहूमधल्या कुठल्याशा ठिकाणी गेले होते. तिथे माझी दिग्दर्शक साजिद खानशी भेट झाली. आमचं बोलणं झालं. कामासंदर्भात मी इथे काही बोलू शकत नाही. तू माझ्या ऑफिसला ये, असं त्याने मला सांगितलं. मलाही काम हवं असल्याने मी दुसऱ्या दिवशी त्याने सांगितलेल्या ऑफिसच्या पत्त्यावर पोहोचले.

मला दरवाजात पाहताच तो ताडक न उभा राहिला. मला घट्ट मिठी मारली. त्याचवेळी त्याने माझे ब्रेस्ट दाबले, पँटमध्ये हात टाकला. सर तुम्ही हे काय करताय, असं मी त्याला विचारलं तर एवढं तर चालतं ना.. असं म्हणून पुढे नाही नाही ते अश्लिल बोलू लागला. तुला काम हवंय.. प्रमुख भूमिका तर लगेच मिळणार नाही. तुझ्यासाठी मी प्रयत्न करेन. पण त्याबदल्यात मला काय मिळेल? असा प्रश्न त्याने मला केला. यादरम्यानच्या संभाषणात त्याने नको नको ते प्रश्न विचारले. जेव्हा त्याने ब्रेस्ट दाबले अन् पँटमध्ये हात टाकला, तेव्हा इथून कधी मी बाहेर पडते असं मला झालं होतं. साधारण अर्ध्या तासाच्या संभाषणानंतर मी निघते, असं सांगून मी ऑफिसबाहेर पडले. मी जर तिथून निसटले नसते तर माझ्यावर अतिप्रसंग झाला असता, असे खळबळजनक आरोप करत अभिनेत्री जयश्री गायकवाडने आपल्यावर ओढावलेला प्रसंग सांगितला. 

“एका कास्टिंग डायरेक्टरने मला एका पार्टीसाठी निमंत्रित केलं होतं. ती पार्टी जुहूमध्ये होती. मी त्यावेळी त्यांच्यासोबत गेले. तेव्हा तिथे मला त्यांनी साजिद खानशी ओळख करुन दिली. आपल्याला येथे कामाशी संबंधित बोलता येणार नाही. तू माझ्या ऑफिसला ये.. असं साजिदने मला सांगितलं. मला कामाची गरज असल्याने मी दुसऱ्याच दिवशी साजिदच्या ऑफिसमध्ये गेले. जसाही दरवाजा उघडला तसं त्याने मला मिठीत घेतलं. माझे ब्रेस्ट दाबायला सुरुवात केली. पँटमध्ये हात टाकला. सुरु असलेल्या प्रकाराने मी घाबरुन गेले. घाबरत घाबरतच हे काय करताय.. असं मी साजिदला विचारलं. त्यावर ‘एवढं तर चालतं…’ म्हणत त्याने मला प्रश्न विचारायला सुरुवात केली.

ज्यावेळी मुली सिने इंडस्ट्रीत नव्या असतात, त्यावेळी त्यांना अनेक दिग्दर्शकांकडे कामासाठी हात पसरावे लागतात. काम द्या… काम द्या म्हणत फिरावं लागतं, अशा मुद्द्यांकडे लक्ष वेधतानाच यादरम्यान अनेक मुलींवर नको ते प्रसंग ओढावत असतात, त्यांना वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं, असं दु:ख अभिनेत्री जयश्री गायकवाडने मांडलं.