एल्प्रो मॉल मध्ये कामगाराचा मोबाईल पळवला

0
258

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) -चिंचवड येथील एका मॉल मध्ये काम करणा-या कामगाराचा मोबाईल फोन अनोळखी व्यक्तीने विश्वासघात करून पळवून नेला. ही घटना सोमवारी (दि. ११) रात्री पावणे नऊ वाजता एल्प्रो मॉल चिंचवड मधील मॅक्डोनाल्ड्स दुकानाच्या समोर घडली.

कुणाल संजय शिलधनकर (वय २७, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एल्प्रो मॉल चिंचवड मधील मॅक्डोनाल्ड्सच्या काउंटरला काम करतात. सोमवारी रात्री पावणे नऊ वाजता एक अनोळखी व्यक्ती फिर्यादीजवळ आला. माझ्या फोनचा डिस्प्ले खराब झाला आहे. मला घरी एक अर्जंट कॉल करायचा आहे. तू मला तुझा फोन दे, असे म्हणून अनोळखी व्यक्तीचे फिर्यादीचा ३५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन घेतला. तो फोन घेऊन आरोपी पळून गेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.