एमपीएससी परीक्षेत प्रथम आलेल्या अश्विनी केदारी हिचे निधन

0
3

दि.८(पीसीबी) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या 2023 च्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमध्ये प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचे आकस्मित निधन झाले आहे. पिंपरी चिंचवड येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. बाथरूममध्ये हीटरचा धक्का बसून उकळतं पाणी ) अंगावर सांडल्यामुळे त्या जवळपास ऐंशी टक्के भाजल्या होत्या. अकरा दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. . स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही शोककळा पसरली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, ते अपूर्ण राहिले.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यास करताना तिने अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवले होते. पाणी जास्त तापल्याचे पाहण्यासाठी गेली असता बाथरूममध्ये हिटरचा धक्का बसून उकळते पाणी अंगावर सांडले. या अपघातात अश्विनी तब्बल ८० टक्के भाजली होती. तत्काळ तिला पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल काही दिवस मृत्यूशी लढा दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचे निधन झाले.

पीएसआय परिक्षेत राज्यात अव्वल

अश्विनी केदारी या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2023 च्या पीएसआय परीक्षेमध्ये राज्यातून मुलींमध्ये पहिल्या आल्या होत्या. अश्विनी केदारी 2019 मध्ये BE ( Mech . ) उत्तीर्ण झाल्या होत्या. पुढे त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतला. युपीएसची तयारी सुद्धा सुरु केली. फक्त युपीएससीच नाही, तर त्यांनी प्लॅन बी म्हणून एमपीएससीची कम्बाईन परीक्षा सुद्धा दिली. 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांचं सिलेक्शन झालं नाही.


2023 च्या परीक्षेमध्ये अश्विनी केदारी या पीएसआय परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आल्या. तरीही त्यांचा अभ्यास सुरूच होता.