एमआयडीसी कार्यालयात चोरी

0
94

पिंपरी, दि 0 ९ (पीसीबी))

एमआयडीसी कार्यालयाचा कोयंडा तोडून चोरट्याने आतील लॅपटॉप चोरून नेला. ही घटना रविवारी सकाळी चिंचवड स्‍टेशन येथे उघडकीस आली.

नितीन किसन चव्‍हाण (वय ३३, रा. इंदिरानगर, चिंचवड स्‍टेशन) यांनी याबाबत रविवारी पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चिंचवड स्‍टेशन येथे एमआयडीसीचे कार्यालय आहे. फिर्यादी हे ठेकेदार आहेत. शनिवारी (दि. ७) सायंकाळी पाच ते रविवारी सकाळी पावणे दहा वाजताच्‍या सुमारास एमआयडीसीचे कार्यालय बंद होते. त्‍यावेळी अज्ञात चोरट्याने एमआयडीसी कार्यालयाच्‍या दरवाजाचा कोयंडा उचकटून आतील लॅपटॉप चोरून नेला. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.