एमआयडीसीतील सहाय्यक अभियंत्याला मागितली खंडणी

0
222

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – उगवता सूर्य पाहायचा असेल तर दहा लाख रुपये कॅश उद्या रेडी ठेव, अशी धमकी देत चिंचवड एमआयडीसी मधील सहाय्यक अभियंत्याला खंडणी मागितली. ही घटना गुरुवारी (दि. २१) रात्री एमआयडीसी ऑफिस, चिंचवड येथे घडली.

संतोष दत्तात्रय सुवर्णकार (वय ४६, रा. एमआयडीसी चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9405470478 या क्रमांकावरून बोलणा-या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चिंचवड एमआयडीसी कार्यालयात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. ते एमआयडीसी ऑफिस मध्ये काम करत असताना 9405470478 या क्रमांकावरून त्यांना रात्री नऊ वाजता फोन आला. उगवता सूर्य पाहायचा असेल ना, तर दहा लाख रुपये कॅश उद्या रेडी ठेव. नाहीतर तुझ्या आयुष्याला कायमचा फुलस्टॉप लावून टाकतो, अशी धमकी दिली. जीवे मारण्याची धमकी देऊन दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.