एफडी मोडायला लावून केली फसवणूक

0
96

रहाटणी, १७ जुलै (पीसीबी) – तुमच्‍या आधारकार्डवरून मोबाइल खरेदी केली आहे त्‍यामुळे तुमच्‍या विरोधात छळवणुकीचा गुन्‍हा दाखल करणार असल्‍याची भिती दाखवत एकाला बँकेतील एफडी मोडायला लावून २२ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ३ जुलै रोजी रहाटणी येथे घडली.याबाबत रहाटणी येथे राहणार्‍या ७३ वर्षीय पुरूषाने मंगळवारी (दि. १६) वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोबाइल क्रमांक 917012763327, 66991524326, 66619292746, इंडस बँक अकाऊंट धारक 250010619711, एसबीआय बँक अकाऊंट नंतर 42712599671 यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना २९जून ते ३ जुलै २०२४ या कालावधीत रहाटणी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी यांना ऑडिओ आणि व्‍हिडीओ कॉल आरोपींनी केला. आपण आयपीएस विजय खन्‍ना, सीबीआय ऑफिसर राहूल गुप्‍ता, फानान्‍स ॲडव्‍हायझर निशा पटेल, चौकशी अधिकारी राकेश रॉय अशी नावे सांगून तुमच्‍या विरोधात तक्रार आली आहे. तुमच्‍या आधारकार्डवर मोबाइल खरेदी केली आहे. तुमच्‍या विरोधात आम्‍ही फसवणुकीचा गुन्‍हा दाखल करणार आहोत. तुम्‍ही नरेश गोयल यांच्‍यासोबत मिळून ५०० करोड रूपयांचे मनी लॉड्रींग केले आहे. तुम्‍ही आम्हाला या चौकशीत मदत करा, आम्‍ही तुम्‍हाला यातून बाहेर काढू, असे सांगत फिर्यादी यांना बँकेतील २२ लाख ३६ हजार ८० रुपयांची एफडी मोडायला लावली.

त्‍यानंतर फिर्यादी यांच्‍या बँक खात्‍यातून २० लाख रुपये भरण्‍यास सांगून ४८ तासांत ही रक्‍कम परत तुमच्‍या खात्‍यावर यईल, असे सांगितले. त्‍यानंतर सिक्‍युरिटी फंड म्‍हणून फिर्यादी यांना पुन्‍हा दाखल लाख रुपये भरण्‍यास सांगून ती रक्‍कम २४ तासांत परत येईल, असे सांगितले. मात्र फिर्यादी यांच्‍याकडून २२ लाख रुपये घेऊन ते पैसे परत न करता फसवणूक केली. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.