मुंबई दि. २३ (पीसीबी) दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा ड्रग्जच्या अँगलने तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुख्य आरोपी म्हणून रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि आणखी काही लोकांना मुख्य आरोपी बनवले आहे. आता या प्रकरणात एनसीबीने रिया, शौविक आणि इतर आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यावेळी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती देखील न्यायालयीन कामासाठी तिथे उपस्थित होते. NCB ने रिया, शौविकसह आणखी काही लोकांवर सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोप केला आहे.
विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी सांगितले की, आरोपपत्रात सर्व आरोपींचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आरोपपत्राचा मसुदा दाखल करताना त्यांनी सांगितले की, रिया चक्रवर्ती आणि शौविक यांनी ड्रग्जचा वापर केला होता आणि त्यांनी सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केले होते.
पुढील सुनावणी 12 जुलैला होणार!
विशेष सरकारी वकील म्हणाले की, न्यायालय सर्व आरोपींवर आरोप निश्चित करणार आहे.
सुनावणीदरम्यान रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती कोर्टात हजर होते. ते म्हणाले की, दोषमुक्तीच्या याचिकांवर निर्णय झाल्यानंतरच आरोप निश्चित केले जातील, असे न्यायालयाने म्हटले आहे. बुधवारी रिया आणि शौविकसह अन्य आरोपी न्यायालयात हजर झाले होते. विशेष न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 जुलै रोजी होणार आहे.
अनेक आरोपींना जामीन मंजूर
सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती जवळपास महिनाभर तुरुंगात होती, त्यानंतर तिला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. परंतु, अद्यापपर्यंत एजन्सी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. रिया व्यतिरिक्त, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतर अनेकांवर देखील अंमली पदार्थांचे सेवन, साठा आणि पैसे पुरवल्याबद्दल या प्रकरणात आरोप लावण्यात आले आहेत. त्यापैकी बहुतांश आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.