एनआयएने देशभारतील तब्बल 76 ठिकाणी छापे

0
168

नवी दिल्ली दि. २३ (पीसीबी) – राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर तसेच ड्रग तस्करांच्या नेटवर्क विरोधात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने देशभारतील वेगवेगळ्या राज्यातील तब्बल 76 ठिकाणी छापे टाकत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया आणि गोल्डी ब्रार यांच्यासाठी काम करणाऱ्या 6 आरोपींना अटक केली आहे. एनआयए याप्रकरणी पुढील कारवाई करत आहे.

NIA ने अटक केलेल्या आरोपींमध्ये लकी खोखर, लखवीर सिंग, हरप्रीत, दलीप बिश्नोई, सुरिंदर आणि हरी ओम यांचा समावेश आहे. एनआयएने मंगळवारी 8 राज्यांतील 76 ठिकाणी छापे टाकले. या कारवाई अंतर्गत पंजाब, हरियाणा, दिल्ली, यूपी, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात कारवाई करण्यात आली आहे.

शस्त्रे आणि रोख रक्कम जप्त
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तीन एफआयआर नोंदवल्यानंतर एनआयएने टाकलेला पाचवा छापा होता. या कालावधीत, एजन्सीने मोठ्या प्रमाणात डिजिटल उपकरणे, काडतुसे, नऊ पिस्तूल आणि रायफल तसेच 2.3 कोटी रोकड जप्त केली आहे. तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर्सची चौकशी आणि यापूर्वी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे एनआयएने छापे टाकण्याचा निर्णय घेतला होता.