एटीएम फोडून बारा लाखांची रोकडे लंपास

0
98

चाकण, दि. 20 (प्रतिनिधी)

एटीएम फोडून चोरट्यांनी 19 लाख 93 हजार 300 रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 19) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील बिरदवडी गावात घडली.

शुभम गजानन जाधव यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरदवडी गावात ज्योतिबा फुले विद्यालयाजवळ हिताची कंपनीचे एटीएम सेंटर आहे. शनिवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम सेंटर मधील एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने तोडली. मशीन मधून 11 लाख 93 हजार 300 रुपये रोकड चोरट्याने चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.