एटीएम फोडण्याचा प्रयत्न प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0
269

भोसरी दि. १३ (पीसीबी) – येथे साधना बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे ही घटना बुधवारी दिनांक 12 दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.

सोहेल सौराय खान (वय 22, रा. हरियाणा), साजिद शरीफ खान (वय 35, रा. हरियाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मयूर हेमंत राजपुरे (वय 32) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी मधील शास्त्री चौकात साधना बँकेचे एटीएम आहे. आरोपी सोहेल याने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून एटीएम मशीन मधील ज्या ठिकाणाहून पैसे निघतात त्या ठिकाणाच्या शटरची छेडछाड केली. एटीएम मधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला. आरोपी साजिद याने एटीएम सेंटरच्या बाहेर थांबून टेहाळणी करत मदत केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.