एटीएम कार्डद्वारे 81 हजारांची फसवणूक

0
67

देहूरोड, दि. 19 : एटीएम कार्डचा गोपनीय पिन पाहून कार्डद्वारे 81 हजार 850 रुपये काढून घेत एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 16) सकाळी एसबीआय एटीएम सेंटर विकासनगर देहूरोड येथे घडली.

बाबासाहेब विनायक जगदाळे (वय 43, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगदाळे हे शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास विकासनगर येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये गेले. त्यांचे लक्ष विचलित करून अनोळखी व्यक्तीने त्यांच्या एटीएम कार्डचा गोपनीय क्रमांक पाहिला. त्यानंतर जगदाळे यांच्या एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या खात्यातून 81,850 रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.