एटीएम कार्डची अदलाबदल करून 70 हजारांची फसवणूक

0
160

दिघी , दि. २९ (पीसीबी) – एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून एका व्यक्तीच्या खात्यावरून 70 हजार 700 रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना बुधवारी (दि. 26) सायंकाळी दिघी येथे घडली.

दादाभाऊ श्रावण मुंढे (वय 53, रा. दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बुधवारी सायंकाळी खरेदीसाठी गेले होते. पैसे काढण्यासाठी ते एटीएम सेंटर मध्ये गेले. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी हातचलाखीने फिर्यादी यांचे एटीएम कार्ड बदलून त्यांचा पिन नंबर चोरून पाहिला. त्यानंतर एटीएम कार्ड द्वारे फिर्यादी यांच्या खात्यातून 70 हजार 700 रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली.