एटीएमची अदलाबदल करत फसवणूक

0
335

भोसरी, दि. १ (पीसीबी) – एटीएम सेंटर मध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मदत करण्याच्या बहाण्याने आलेल्या एका अनोळखी इसमाने एटीएमची अदलाबदल केली. त्यानंतर एटीएम द्वारे पैसे काढून घेत ४९ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना रविवारी (दि. २९) दुपारी आळंदी रोड, भोसरी येथील एसबीआय बॅंकेजवळ घडली.

अतिश बाबुराव मोतेकर (वय ३३, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोतेकर हे पैसे डिपॉझिट करण्यासाठी आळंदी रोडवरील एसबीआय बॅंकेशेजारी असलेल्या सीडीएम सेंटरमध्ये गेले होते. तिथे मोतेकर यांना मदत करण्याच्या बहाण्याने एक अनोळखी व्यक्ती आला. त्याने मोतेकर यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलले. त्यानंतर त्या एटीएम कार्डचा वापर करून बँक खात्यावरून ४९ हजार ६२ रुपये काढून घेत मोतेकर यांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.