एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये चोरीचा प्रयत्न

0
436

निगडी, दि. २० (पीसीबी) – एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये तीन चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 19) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे घडली.

राजेंद्र पोपट बडे (वय 35, रा. जोगेवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), कृष्णा धुल्या रजपूत (वय 28, रा. शिरगाव, पुणे), सुशांत कोशोर घोडेस्वार (वय 24, रा. वडारवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दिनेश धोंडीराम शिर्के (वय 31, रा. चाकण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास आरोपी ट्रान्सपोर्टनगर येथी एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये आले. त्यांनी एटीएम सेंटर मधील कॅमे-याची दिशा बदलली. त्यांनतर एटीएमशी छेडछाड करून पाठीमागील स्विच वायर काढली आणि पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मशीन मधील पैसे चोरता आले नाहीत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिघांना अटक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.