नवी दिल्ली, दि. २४ –
हिंदुस्तान अँटिबायोटिक्स (एचए) मजदुर संघाच्या अध्यक्षपदी खासदार मेधा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अफाट जनसंपर्क असलेल्या एक अत्यंत कार्यक्षम लोकप्रतिनीधी म्हणून त्यांची प्रतिमा आहे.
मेधा कुलकर्णी या कोथरूडच्या माजी आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे.कुलकर्णी यांच्या रूपाने पुण्यातील महिलेला पहिल्यांदाच एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.












































