एक हजार परताव्याच्या आमिषाने 49 लाखांची फसवणूक

0
465

पुनावळे, दि. ३० (पीसीबी) – गुंतवणूक केलेल्या रकमेवर 1000 टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीची 49 लाख 39 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 7 एप्रिल ते 7 मे या कालावधीत पुनावळे येथे ऑनलाइन माध्यमातून घडला.

याप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क केला. त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 100 दिवसात 1000 टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखवण्यात आले. त्यातून त्यांच्याकडून गुंतवणूक स्वरूपात 49 लाख 39 हजार रुपये घेते त्यांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.