“एक पेड माँ के नाम”

0
164

पिंपरी, दि.१७ ऑगस्ट (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने “एक पेड माँ के नाम” अर्थात “एक वृक्ष आईच्या नावे” या उपक्रमाची सुरुवात महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. तसेच दिव्यांग भवन व शहरातील दिव्यांग सामाजिक संघटना यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांनी निगडी येथील भक्ती शक्ती चौक ते पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत तिरंगा सन्मान रॅली काढण्यात आली.

पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिका, फिलिप्स ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस एलएलपी कंपनी आणि डीवायपी इन्फ्रा प्रायवेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहर व रांजणगाव एमआयडीसी परिसरामध्ये १६ हजार झाडे लावण्यात येणार असून या झाडांची देखभाल देखील करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गुरुवार १५ ऑगस्ट २०२४ रोजी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बिग्रेडियर एस तनुजा, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उद्यान आणि वृक्षसंवर्धन विभागाचे उपआयुक्त रविकिरण घोडके, उद्यान अधिकारी राजेश वसावे, मिलिटरी ऑफिसर शेंडे, डीवायपी कंपनीचे संचालक दत्तात्रय यादव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.